
आंतरराष्ट्रीय गुणवंत सन्मान सोहळा २०२७
सामाजिक कार्य, उद्योग-व्यवसाय, साहित्य, कविता, पत्रकारिता, साहित्यिक संस्था, नियतकालिके, प्रकाशने, मराठी युट्युबर्स आणि परदेशात मराठी भाषिकांचे संघटन — अशा विविध माध्यमांतून परदेशात मराठी भाषा जपणाऱ्यांसाठी हा आगळा-वेगळा सन्मान सोहळा. गेल्या ५ वर्षांत आमच्या उपक्रमांत सहभागी झालेले विदेशातील मराठी बांधव आणि अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले सन्माननीय मित्रगण यांचाही या प्रसंगी सन्मान होईल.
कृपया गुगल फॉर्म त्वरित भरा. आपल्या देशात या क्षेत्रांत काम करणाऱ्या उपक्रमशील व्यक्तींची नावे, नंबर आणि कार्यक्षेत्र आम्हाला कळवा.
- मराठी भाषा प्रतिभा गौरव सन्मान
- मराठी भाषा उत्कृष्ट सेवा सन्मान
- मराठी भाषा साहित्यरत्न सन्मान
- मराठी भाषा काव्यरत्न सन्मान
- उद्योग गौरव सन्मान
- मराठी संस्कृती सेवा सन्मान
- मराठी दीपस्तंभ सन्मान
- आंतरराष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार
- मराठी नारी शक्ती गौरव सन्मान



























