प्रकाशने

परदेशात राहूनही मराठीत लिहिणाऱ्या लेखणीला हक्काचे पान.

आभाळाखालची कविता — मुखपृष्ठ

काव्यसंग्रह

आभाळाखालची कविता

जगभर पसरलेल्या मराठी कवी-कवयित्रींच्या कवितांचा संग्रह. आखाती देशांपासून आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि आग्नेय आशियापर्यंत — घरापासून दूर असूनही मराठीत व्यक्त होणाऱ्या मनांचा हा आवाज.

  • २०२४ — २६ फेब्रुवारी: जागतिक कवी परिचय मेळाव्यात मुखपृष्ठाला अनुमोदन
  • २०२६ — १७ मे: पुण्यात प्रकाशन सोहळा
  • संपादिका: सौ. माधुरी पुराणिक · मुखपृष्ठ: श्री. अनिल कांबळे (UAE) · प्रस्तावना: अरुणा मुल्हेरकर (अमेरिका)
  • प्रत हवी असल्यास संपर्क: दिलीप पुराणिक, +91 76209 21098

संग्रहातील कवी

आभाळाखालच्या कवितेचे कवी

जगाच्या कानाकोपऱ्यातून मराठीत लिहिणारे कवी-कवयित्री.

कवींसाठी

आपली कविता पाठवा

आपण भारताबाहेर राहता आणि मराठीत कविता लिहिता? पुढील खंडासाठी आपली स्वरचित, अप्रकाशित कविता पाठवा.

  • कविता आपली स्वतःची असावी आणि यापूर्वी पुस्तकात प्रकाशित झालेली नसावी.
  • युनिकोड मराठीत टाइप केलेली कविता, सोबत आपले नाव, देश आणि थोडक्यात परिचय.
  • प्रवेशिका सभासद विभागात स्वीकारल्या जातील. तोपर्यंत ई-मेलने पाठवा.

आमच्या व्यासपीठावर प्रकाशित

आमच्या कार्यक्रमांत प्रकाशित झालेली पुस्तके