गोपनीयता धोरण
आपली माहिती आम्ही कशी वापरतो.
आभाळाखालची शाळा फाउंडेशन, पुणे ही संस्था आपण संपर्क फॉर्म, देणगी किंवा सभासद नोंदणीद्वारे दिलेली माहिती (नाव, ई-मेल, फोन, देश, PAN, पत्ता) फक्त पुढील कामांसाठी वापरते: आपल्याला उत्तर देणे, देणगीची पावती व 80G कागदपत्रे देणे, आणि आमच्या उपक्रमांची माहिती पाठवणे.
ई-मेल
आमच्या प्रत्येक माहितीपर ई-मेलमध्ये "सदस्यता रद्द करा" दुवा असतो. एका क्लिकवर आपले नाव यादीतून काढले जाते. ई-मेल उघडला गेला का आणि दुवे क्लिक झाले का याची एकत्रित आकडेवारी आम्ही पाठवणी सुधारण्यासाठी पाहतो.
पेमेंट
ऑनलाइन देणग्या Razorpay मार्फत स्वीकारल्या जातात. कार्ड किंवा बँक तपशील आमच्याकडे साठवले जात नाहीत.
माहिती कोणाला दिली जात नाही
आपली माहिती आम्ही विकत नाही किंवा इतरांना देत नाही — कायद्याने आवश्यक असेल तेव्हाच (उदा. आयकर विभागाला 80G विवरण).
संपर्क
आपली माहिती पाहण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी s.puranik2020@gmail.com वर लिहा.
