आभाळाखालची शाळा

भिंती नाहीत, फळा नाही, ठरलेला अभ्यासक्रम नाही. इथे शिकवतो तो अनुभव — आणि वर्ग भरतो जगभरातल्या मराठी माणसांचा.

"माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।"— श्री संत ज्ञानेश्वर माऊली

ही शाळा कशी आहे?

ज्या शाळेचे छत म्हणजे आभाळ

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार हे आमचे काम. फक्त पुस्तकांतून नव्हे, तर सण-वार,सांस्कृतिक कार्येक्रम, स्पर्धा, गप्पा, गोष्टी, छंद, संस्कार वर्ग, शिबिरे, गाणी, कविता आणि एकमेकांच्या भेटींतून मराठी भाषा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे.

मराठीसोबतच सर्व भारतीय भाषांमध्ये साहित्य व संस्कृतीसाठी काम करणाऱ्यांचे हे हक्काचे व्यासपीठ आहे.

आमचा दृष्टिकोन आणि उद्दिष्टे वाचा
  • भिंती
  • फळा
  • पुस्तके
  • अभ्यासक्रम
  • अनुभव

शाळा सुरू झाली कराचीत

एका वर्गापासून जगभराच्या वर्गापर्यंत

२०२१ मध्ये कराचीतील मराठी कुटुंबांना ऑनलाइन मराठी शिकवायला सुरुवात झाली. त्या वर्गाला नाव मिळाले — आभाळाखालची शाळा. आज ७५ हून अधिक देशांतील विविध वयोगटातील मराठी बांधव या शाळेत सहभागी होतात.

  • पाकिस्तान
  • यू.ए.ई.
  • मॉरिशस
  • अमेरिका
  • कॅनडा
  • इंग्लंड
  • ऑस्ट्रेलिया
  • न्यूझीलंड
  • सौदी अरेबिया
  • बहरीन
  • ओमान
  • कतार
  • कुवेत
  • केनिया
  • युगांडा
  • दक्षिण आफ्रिका
  • सिंगापूर
  • मलेशिया
  • जपान
  • जर्मनी
  • फ्रान्स
  • स्पेन
  • नेदरलँड्स
  • आयर्लंड
  • आणि अनेक देश

इतिहासात पहिल्यांदा

जे यापूर्वी कधीच घडले नव्हते

  1. २०२१

    पाकिस्तानातून साहित्य संमेलन

    ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तिन्ही दिवस कराचीतील मराठी बांधवांनी थेट अनुभवले.

  2. २०२२

    कराचीत शिवजयंती

    भारत-पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पाकिस्तानातील १५० मराठी बांधवांना प्रमाणपत्रे.

  3. २०२४

    ५५ देशांत एकाच वेळी राष्ट्रगीत

    प्रजासत्ताक दिनी जगभरातील मराठी बांधवांनी ऑनलाइन एकत्र येऊन वंदे मातरम् आणि जन गण मन गायले.

पुढचे वर्ग

आगामी उपक्रम आणि स्पर्धा

स्पर्धांसाठी नोंदणी, प्रवेशिका आणि प्रमाणपत्रे सभासद विभागात मिळतील.

आंतरराष्ट्रीय गुणवंत सन्मान सोहळा २०२७
सन्मान सोहळा

आंतरराष्ट्रीय गुणवंत सन्मान सोहळा २०२७

  • २३ व २४ जानेवारी २०२७
  • स्थळ: पुणे

सामाजिक कार्य, उद्योग-व्यवसाय, साहित्य, कविता, पत्रकारिता, साहित्यिक संस्था, नियतकालिके, प्रकाशने, मराठी युट्युबर्स आणि परदेशात मराठी भाषिकांचे संघटन — अशा विविध माध्यमांतून परदेशात मराठी भाषा जपणाऱ्यांसाठी हा आगळा-वेगळा सन्मान सोहळा. गेल्या ५ वर्षांत आमच्या उपक्रमांत सहभागी झालेले विदेशातील मराठी बांधव आणि अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले सन्माननीय मित्रगण यांचाही या प्रसंगी सन्मान होईल.
कृपया गुगल फॉर्म त्वरित भरा. आपल्या देशात या क्षेत्रांत काम करणाऱ्या उपक्रमशील व्यक्तींची नावे, नंबर आणि कार्यक्षेत्र आम्हाला कळवा.

  • मराठी भाषा प्रतिभा गौरव सन्मान
  • मराठी भाषा उत्कृष्ट सेवा सन्मान
  • मराठी भाषा साहित्यरत्न सन्मान
  • मराठी भाषा काव्यरत्न सन्मान
  • उद्योग गौरव सन्मान
  • मराठी संस्कृती सेवा सन्मान
  • मराठी दीपस्तंभ सन्मान
  • आंतरराष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार
  • मराठी नारी शक्ती गौरव सन्मान
उपक्रम

जागतिक शिवजयंती उत्सव २०२७

  • १९ फेब्रुवारी २०२७
  • ऑनलाइन, जगभरातील शाखांसह

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जगभरातील मराठी बांधवांचा एकत्र सोहळा — पोवाडे, व्याख्याने आणि मुलांचे सादरीकरण.

स्पर्धा

मराठी भाषा गौरव दिन — वक्तृत्व व अभिवाचन स्पर्धा

  • २७ फेब्रुवारी २०२७
  • ऑनलाइन

कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी.
बालक, युवक आणि प्रौढ अशा तीन गटांत.

पाहा

जगभरातील मराठी मने, पडद्यावर

कार्यक्रमजागतिक मराठी भाषा गौरव दिन परिषद — दिवस १ (३ मार्च २०२४)३ मार्च २०२४जागतिक मराठी भाषा गौरव दिन परिषद २०२४

आमचे गुरुजन

ज्यांच्या विचारांवर ही शाळा उभी आहे

संत, राजे, समाजसुधारक, कवी, शाहीर आणि कलावंत — मराठीविषयी त्यांचे विचार.

  • संत ज्ञानेश्वर

    संत ज्ञानेश्वर

    ज्ञानेश्वरीकार, १३ वे शतक

    माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंहि पैजासीं जिंके ॥

    मराठीचे पहिले आणि अजरामर गौरवगान.

  • संत तुकाराम

    संत तुकाराम

    वारकरी संत कवी, १७ वे शतक

    आम्हां घरीं धन शब्दांचीच रत्नें । शब्दांचीच शस्त्रें यत्न करूं ॥

    शब्द हीच संपत्ती — आभाळाखालच्या शाळेचा पहिला धडा.

  • छत्रपती शिवाजी महाराज

    छत्रपती शिवाजी महाराज

    स्वराज्य संस्थापक

    प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।

    राजव्यवहारात मराठीला मान देणारे राजे; "राज्यव्यवहार कोश" त्यांच्याच प्रेरणेने.

  • महात्मा जोतिराव फुले

    महात्मा जोतिराव फुले

    सत्यशोधक, समाजसुधारक

    विद्येविना मति गेली । मतिविना नीति गेली ॥

    शिक्षण हीच मुक्तीची पहिली पायरी.

  • सावित्रीबाई फुले

    सावित्रीबाई फुले

    पहिल्या महिला शिक्षिका, कवयित्री

    १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा. आमची शाळा त्याच पुण्यातून जगभर जाते.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    भारतीय संविधानाचे शिल्पकार

    शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.

    "मूकनायक" आणि "बहिष्कृत भारत" मधून मराठी पत्रकारितेला नवा आवाज.

  • राजर्षी शाहू महाराज

    राजर्षी शाहू महाराज

    कोल्हापूर संस्थान

    मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण, वसतिगृहे, कुस्ती आणि कलांना राजाश्रय.

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

    माळव्याच्या राणी

    देशभर घाट, धर्मशाळा, विहिरी; महेश्वरी वस्त्रकलेला आश्रय.

  • लोकमान्य टिळक

    लोकमान्य टिळक

    "केसरी"चे संपादक

    स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

    सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते — आज आमचा गणेशोत्सव जागतिक झाला.

  • गोपाळ गणेश आगरकर

    गोपाळ गणेश आगरकर

    "सुधारक"चे संपादक

    इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार.

    विवेकनिष्ठ समाजसुधारणेचा निर्भीड आवाज.

  • न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

    न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

    समाजसुधारक, विचारवंत

    प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा आणि मराठी ग्रंथोत्तेजक चळवळीचे आधार.

  • नामदार गोपाळ कृष्ण गोखले

    नामदार गोपाळ कृष्ण गोखले

    सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे संस्थापक

    निःस्वार्थ लोकसेवेचा आदर्श — आमच्या स्वयंसेवकांचा वसा.

  • महर्षी धोंडो केशव कर्वे

    महर्षी धोंडो केशव कर्वे

    स्त्रीशिक्षणाचे प्रणेते

    भारतातील पहिले महिला विद्यापीठ (१९१६) स्थापन केले.

  • साने गुरुजी

    साने गुरुजी

    लेखक, शिक्षक

    "श्यामची आई" — मराठी मनाला संस्कार देणारे पुस्तक; आंतरभारतीचे स्वप्न.

  • संत नामदेव

    संत नामदेव

    वारकरी संत, १३–१४ वे शतक

    नाचू कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावूं जगीं ॥

    मराठी भक्तीचा आवाज पंजाबपर्यंत नेणारे संत.

  • संत एकनाथ

    संत एकनाथ

    संत कवी, १६ वे शतक

    संस्कृत वाणी देवें केली । तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली ? ॥

    लोकभाषा मराठीचा ठाम पुरस्कार.

  • समर्थ रामदास स्वामी

    समर्थ रामदास स्वामी

    संत, "दासबोध"कार

    मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ॥

    आमच्या कामाचे सारच या ओळीत.

  • केशवसुत

    केशवसुत

    आधुनिक मराठी कवितेचे जनक

    एक तुतारी द्या मज आणुनि । फुंकिन मी जी स्वप्राणानें ॥

    मराठी कवितेला नव्या युगात नेणारा आवाज.

  • कवी कुसुमाग्रज

    कवी कुसुमाग्रज

    ज्ञानपीठ विजेते कवी

    त्यांचा जन्मदिन, २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो.

  • वि. स. खांडेकर

    वि. स. खांडेकर

    मराठीचे पहिले ज्ञानपीठ विजेते

    "ययाति" कादंबरीसाठी १९७४ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार.

  • बहिणाबाई चौधरी

    बहिणाबाई चौधरी

    लोककवयित्री

    शेतात, जात्यावर रचलेल्या ओव्या — आभाळाखालची खरी कविता.

  • पु. ल. देशपांडे

    पु. ल. देशपांडे

    महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व

    लेखक, नट, संगीतकार — मराठी माणसाला स्वतःवर हसायला शिकवणारे.

  • शांता शेळके

    शांता शेळके

    कवयित्री, गीतकार

    मराठी गीतांना शब्दांचे सौंदर्य देणाऱ्या कवयित्री.

  • शाहीर अमर शेख

    शाहीर अमर शेख

    संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आवाज

    डफावर थाप आणि खड्या आवाजात महाराष्ट्राचे स्वप्न.

  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

    "फकिरा"चे लेखक

    शाळेत फारसे न गेलेले, पण जगाला शिकवणारे लेखक — आभाळाखालच्या शाळेचे खरे विद्यार्थी.

  • बालगंधर्व

    बालगंधर्व

    संगीत रंगभूमीचे सम्राट

    मराठी संगीत नाटकाला सुवर्णयुग देणारे कलावंत.

  • दादासाहेब फाळके

    दादासाहेब फाळके

    भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक

    १९१३ मध्ये "राजा हरिश्चंद्र" — भारताचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट.

  • भारतरत्न लता मंगेशकर

    भारतरत्न लता मंगेशकर

    स्वरसम्राज्ञी

    मराठी आणि भारतीय गीतांना जगभर पोहोचवणारा स्वर.

आभाळाखालची कविता — मुखपृष्ठ

प्रकाशन

जगभर पसरलेल्या मराठी कवितेचा एक संग्रह

दुबईपासून टोकियोपर्यंत आणि मॉरिशसपासून टोरांटोपर्यंत — परदेशात राहूनही मराठीत लिहिणाऱ्या कवी-कवयित्रींच्या कवितांचा संग्रह.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा

कंपन्या व CSR टीमसाठी

मराठी संस्कृतीसाठी पारदर्शक भागीदारी

  • नोंदणीकृत सार्वजनिक न्यास, 12A व 80G मान्यता
  • २०२१ पासूनच्या उपक्रमांची तारीखवार नोंद आणि माध्यमांतील प्रसिद्धी
  • Schedule VII: भारतीय कला, संस्कृती व भाषेचे संवर्धन, शिक्षण
प्रमाणपत्रे व माहिती पाहा

देणगीदारांसाठी

शाळेला छप्पर नको, पण आधार हवा

आपली देणगी स्पर्धा, ऑनलाइन वर्ग, कवितासंग्रहाचे प्रकाशन आणि परदेशातील मराठी मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरली जाते. भारतातील देणगीदारांना 80G अंतर्गत करसवलत.

देणगी द्या

आभाळाखालची कविता

संग्रहातील कवी-कवयित्री

जगाच्या कानाकोपऱ्यातून मराठीत लिहिणारे ३२ कवी.

संग्रहाविषयी अधिक